उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?

उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा चांगलाच गाजला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंगविक्षेप करत नक्कल केल्यामुळे त्यांच्याविरोधात विरोधी पक्षात चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांना धारेवर धरले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अशा प्रकारचा पायंडा पडणे योग्य नाही असे सांगताना उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर चालेल का? असा खडा सवाल विचारला.

बुधवार, २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंगविक्षेप करत नक्कल केल्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला होता.

हे ही वाचा:

अहमदनगरला भाजपाचा झेंडा; महाविकास आघाडीला ठेंगा

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन

सुकेश चंद्रशेखर विरुद्ध नोरा फतेही देणार साक्ष?

कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचा अपमान करायची सभागृहाची संस्कृती नसताना भास्कर जाधव यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचे कृत्य सभागृहात केले. त्यामुळे जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

यावेळी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्षांना विनंती केली की त्यांनी या विषयात योग्य तो निर्णय घ्यावा आणि भास्कर जाधव यांना माफी मागायला सांगावी. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की अशाने सभागृहात चुकीचा पायंडा पडू शकतो. उद्या कोणी वाकडं तोंड करून बोलेल किंवा कोणी बारीक आवाज काढेल हे चालवून घ्यायचे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.

Exit mobile version