भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी वक्फ विधेयकाला देशासाठी एका नव्या युगाची सुरुवात म्हटले आणि सरकारच्या पुढाकाराचे कौतुक केले. राज्यसभेत त्यांनी नेहमीच्या शैलीत खणखणीत भाषण करत विरोधकांची पिसे काढली.
ते म्हणाले की, “… आम्ही या विधेयकाला ‘उम्मीद’ (आशा) असे नाव दिले आहे, पण काही लोक ‘उम्माह’ (इस्लामी राष्ट्र) चे स्वप्न पाहत होते. ज्यांना ‘उम्मीद’ हवे होते त्यांना आशेचा किरण दिसतोय, पण ‘उम्माह’ हवे असलेले निराश झाले आहेत,” असे त्यांनी सांगितले.