मोदी सरकारची सात वर्षे आज पूर्ण झाली. गेल्या सात वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या एकूणच कामगिरीचा आलेख हा चढता आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोदी सरकारने पहिल्याच कार्यकाळापासून स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले होते. स्वच्छता मिशनची विरोधकांनी केलेली चेष्टा हे सर्वश्रुत आहे. परंतु गेल्या सात वर्षांवर आपण नजर टाकली, तर भारताचा स्वच्छतेच्या बाबतीत चेहरा मोहरा किती पालटलाय हेच आपल्याला दिसून येईल. म्हणूनच म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है..
हे ही वाचा:
योगींनी पत्रकारांना दिले, महाराष्ट्रातील पत्रकारांचे काय?
ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष; मुलांच्या हाती आले घमेले!
आधीच ‘उल्हास’; त्यात उशिरा आली जाग
वसुलीच्या ‘मातोश्री कनेक्शन’ची जोरदार चर्चा
भारताचे रुप हे इतर देशांमध्ये अधिक उत्तम व्हावे या हेतूने स्वच्छता ही गरजेची होती. स्वच्छता अभियानांतर्गत अनेक गावे आज आपल्याला कचरामुक्त दिसू लागलेली आहेत. भारतातील कचरामुक्त शहरांचा दर्जा हा ६ शहरांना मिळालेला आहे. तर ८६ शहरे तीन स्टार घेऊन स्वच्छतेच्या बाबत पुढे आलेली आहे. स्वच्छता अभियानाला पूर्ण देशातून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. या सर्वेक्षणांतर्गत २०२१ मध्ये तब्बल ४ हजार ३२० शहरांनी या अभियानात भाग घेतला.
केवळ सरकार इतकंच करून थांबले नाही तर, ५ लाखांपेक्षा अधिक सफाई कर्मचारी वर्गासाठी विविध कल्याणकारी योजनाही राबविण्यात आलेल्या आहेत. आज भारतातील ३ हजारपेक्षा अधिक शहरांमध्ये ६० हजारांपेक्षा अधिक शौचालये आहेत. या शौचलयांना गुगलच्या मानचित्रावरही स्थान मिळाले आहे.
सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सुधारणा-
९९% पेक्षा जास्त शहरे उघड्यावर शौचाला बसण्यापासून मुक्त झाली आहेत.
६६ लाखांहून अधिक घरांमध्ये शौचालये बांधली गेली आहेत.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण आता ६८% झाले आहे.#7YearsOfSeva pic.twitter.com/y8A6zcjryn
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) May 30, 2021
१८ करोडपेक्षा अधिक नागरिकांनी शंका निरसनाचे एप डाऊनलोड केलेले आहे. यामधून ९० टक्केपेक्षा अधिक शंकाचे निरसनही झालेले आहे. स्वच्छता अभियानाने अनेक गावांचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहे. ६६ लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत. तसेच ६ लाखांपेक्षा अधिक सार्वजनिक शौचालये बांधण्यात आलेली आहेत. भारतातील २ हजार ५३२ शहरांना ओडीएफने प्रमाणित करण्यात आलेले आहे.