‘चिकन खुद फ्राई होने के लिए आ गया’

‘चिकन खुद फ्राई होने के लिए आ गया’

सुब्रमण्यम स्वामी यांनी केला प्रहार

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी विरोधकांना मोठा दणका दिला. मनी लाँडरिंग कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी चिदंबरम यांची खिल्ली उडवली आहे.

राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, पीएमएलएवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पी चिदंबरम आणि इतर नेत्यांसाठी ‘चिकन खुद तलने के लिए आ जाने’ असा आहे. पी चिदंबरम यांनी यूपीए सरकारमध्ये ईडीला अधिकार दिले होते, असे खोचक ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

मनी लाँडरिंग कायद्याच्या अनेक तरतुदींच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने ईडीचे अधिकार कायम ठेवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए अंतर्गत तपास, शोध, अटक आणि मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार ईडीकडे कायम ठेवले आहेत. तसेच मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक करण्याच्या प्रक्रियेवरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयानंतर भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी चिदंबरम यांची खिल्ली उडवली.

कायदा त्याचे काम करत असून, एक कुटुंब स्वतःला कायद्याच्या वर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काँग्रेसचा हा प्रयत्न चालणार नाही. आपण सर्वांनीच देशाच्या कायद्याचा आदर केला पाहिजे. काँग्रेसचा निषेध हा सत्याग्रह नसून सत्य लपवण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी म्हटले आहे. ते देशाच्या नव्हे तर कुटुंबाच्या रक्षणासाठी आंदोलन करत आहेत. गांधी कुटुंबाने तपास यंत्रणांना उत्तर द्यावे, पण असे न होता त्यांना ते कायद्याच्या वर असल्याचे वाटत आहे, असंही नड्डा म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी

यावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील काँग्रेसवर हल्लबोल केला आहे. ते म्हणाले, गांधी परिवारातील सदस्यांनी जर भ्रष्टाचार केला नसेल तर, त्यांना कशाची भीती आहे. काँग्रेसशासित राज्यांमध्ये बलात्कार, खुनासारखे गुन्हे वाढत आहेत, पण तेथील मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून असून, चोरी ते चोरी आणि वर शीरजोरी त्यात भ्रष्टाचारपण आणि सोबत गदारोळपण अशी टीका ठाकून यांनी केली आहे.

Exit mobile version