मुंबईच्या मढ येथील एक स्टुडिओची भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्यासह गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या आणि इतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. त्यावेळी अनधिकृत स्टुडिओ ताबडतोब तोडले पाहिजे किंवा कारवाईचे आदेश दिल्याशिवाय येथून हलणार नसल्याचे अतुल भातखळकर यांनी भूमिका घेतली होती. त्यावर मुंबई पालिकेने तातडीने भूमिका घेत, स्टुडिओला पालिकेने बेकायदेशीर घोषित केले आहे.
किरीट सोमय्या यांनी मढमधील स्टुडिओ बांधकाम प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि आदित्य ठाकरे मंत्री व अस्लम शेख मंत्री असताना दादागिरी करुन त्यांनी एक हजार कोटींचा घोटाळा केला असल्याची आरोप करण्यात आला आहे. पर्यावरण कायद्यानुसार कोणत्याही गोष्टीला मढसारख्या भागात बांधकाम करत असताना परवानगी नसताना आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघांकडून पदाचा आणि प्रशासनाचा वापर करुन या भागात बांधकाम करण्यात आले, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण
‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन
प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात
नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक
२०२१ मध्ये या स्टुडिओचा परवाना संपला होता. मग पुढे कोणाच्या आदेशाने परवानगी दिली होती? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. अनधिकृत स्टुडिओ ताबडतोब तोडले पाहिजे आणि कारवाईचे आदेश दिल्याशिवाय येथून हलणार नसल्याचे अतुल भातखळकर म्हणाले होते. त्यानंतर मुंबई पालिकेने या स्टुडिओला बेकायदेशीर घोषित केले आहे.