‘काँग्रेसला दूर करून ‘नेशन फर्स्ट’ला प्राध्यान्य देणाऱ्या मोदींच्या हाताला बळकटी द्या’

यूपीचे मुख्यमंत्री योगींचे सोलापूरमधून जनतेला आवाहन

‘काँग्रेसला दूर करून ‘नेशन फर्स्ट’ला प्राध्यान्य देणाऱ्या मोदींच्या हाताला बळकटी द्या’

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांकडून देशभरात जोरदार प्रचार सुरु आहे.भाजपने आपल्या प्रचाराकरिता पक्षातील हुकमी एक्के बाहेर काढले आहेत.४०० पारच जसा नारा दिला आहे, त्याप्रमाणे पक्षदेखील काम करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच महाराष्ट्रामध्ये प्रचारांचा षटकार मारला आणि आज यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचाराकरिता महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी सभा पार पडणार आहेत.सोलापूर, हातकणंगले आणि सांगली या ठिकाणी योगींच्या सभा पडणार आहेत.दरम्यान, सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री योगींची आज (१ मे) दुपारी सभा पार पडली.यावेळी मुख्यमंत्री योगींनी काँग्रेसवर टीका करत जोरदार भाषण केले.

ते म्हणाले की, देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा असून त्यांच्या ‘फॅमिली फर्स्ट’ या वृत्तीमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे काँग्रेसला दूर करा आणि ‘नेशन फर्स्ट’ला प्राध्यान्य देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या हाताला अधिक बळकटी द्या, असे आवाहन मुख्यमंत्री योगींनी जनतेला केले.तसेच आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण कामकाजाचा उल्लेख केला.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केलं.यावेळी महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.

हे ही वाचा:

सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली!

सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?

कोव्हीशिल्ड लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची चर्चा, पण तथ्य नाही

टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला करा!

काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, अयोध्येत श्री रामलल्लाचे मंदिर उभारण्याची संधी यापूर्वी काँग्रेसलाही होती. परंतु त्यांनी घालवली. त्यांना रामाचे अस्तित्वच मान्य नव्हते. याउलट पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात सब का साथ-सब का विकास, राम मंदिराची उभारणी यासारखे अनेक निर्णय घेतले. राम मंदिराच्या रुपाने राष्ट्र मंदिरच साकारले असल्याचे योगी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हिंदूंच्या एकजूटीने राम मंदिराची उभारणी झाली.हिंदूंच्या एकजुटीला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. मागील दहा वर्षात मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा सामाजिक न्यायाचा विचार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांपासून प्रेरणा घेऊन कारभार चालविला आहे.त्यामुळे मोदींच्या पाठीशी जनतेची ताकद ठामपणे उभी आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

Exit mobile version