शेंबड्या मुलांसारख्या शपथा घेऊ नका

शेंबड्या मुलांसारख्या शपथा घेऊ नका

“वकील आहात, लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नयेत” अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फटकारलं. “जो नियम अनिल देशमुख, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना लागू झाला होता, तोच आता अनिल परब यांना लागतो” असंही नितेश राणे म्हणाले.

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विचारलं होतं की गृह खाते अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, यावर काल शिक्कामोर्तब झालं आहे. वकील असलेल्या माणसाने अशा प्रकारच्या शपथा खायच्या असतात का? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवं” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

“जो नियम अनिल देशमुख यांना लागतो, जो नियम सिंचन घोटाळ्याच्या वेळी अजित पवारांना लागला, जो नियम आदर्श घोटाळ्याच्या वेळी अशोक चव्हाण यांना लागू होतो, तोच अनिल परब यांना लागतो. तेव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नव्हत्या. ते चौकशीला सामोरे गेले. लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका” असं नितेश राणे म्हणाले.

“सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यामधले संवाद हे एनआयकडे आहेत. टेलिग्रामचे चॅट पण त्यांच्याकडे आहेत. उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा” अशा शब्दात नितेश राणेंनी निशाणा साधला.

हे ही वाचा:

अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर मकोका लावा

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे

मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

“मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

Exit mobile version