सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा

आमदार बच्चू कडू यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा

महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सुरु असून त्यापैकी एक कंपनी पेटीयम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यामार्फत करत आहेत. त्यामुळे त्यांनी ही जाहिरात बंद करावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान- थोर सर्व स्तरापर्यंत होतो आणि या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वसई तालुक्यातील नालासोपारा येथील रहिवासी प्रितेश विलास पवार यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष तक्रार केलेली असून त्यांनी यासाठी आझाद मैदानात आंदोलनही केलेले आहे, असे कडू यांनी म्हटले आहे.

पेटीयम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घातली आहे. भारतरत्न सन्मानाने सन्मानीत झालेल्या व्यक्तीने अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणे लोकांच्या हिताचे नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकर हे भारतरत्न सन्मानित असल्याने त्यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नये ही आपल्या देशासाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

हे ही वाचा:

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंग्याने उजळला

रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार

कॅनडामधील भगवत गीता पार्कमध्ये फुटीरवाद्यांकडून तोडफोड

महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, असेही पत्रात नमूद केले आहे.

Exit mobile version