पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर अनेक दिवसांचे मौन आणि हजारोंचा मोर्चा काढून देखील, अखेर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना वनमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. ३ दिवसांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मात्र, संजय राठोड हे अद्यापही मंत्रिपदावर आहेत, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. कारण, राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी तो मुख्यमंत्र्यांनी अद्याप राज्यपालांकडे पाठवलेला नाही, असा दावा वाघ यांनी केला आहे.
मा.मुख्यमंत्री जी
संजय राठोड चा राजीनामा घेऊन ३ दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही
राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आज ही मंत्री आहेचं..ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे झाले
या संदर्भात”वाण नाही पण गुण लागला”हे तुमच्याबाबतीत होऊ देऊ नका pic.twitter.com/copfCeWEKn— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021
“मा. मुख्यमंत्री जी, संजय राठोड चा राजीनामा घेऊन ३ दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आज ही मंत्री आहेच. ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे झाले. या संदर्भात ‘वाण नाही पण गुण लागला’ हे तुमच्याबाबतीत होऊ देऊ नका.” असे ट्विट चित्र वाघ यांनी केले आहे.
हे ही वाचा:
संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही
“जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही.” असे सांगतानाच, “राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत? मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा. त्यांचा राजीनामा मातोश्री किंवा शिवेसना भवनात फ्रेम करून ठेवला आहे का?” असा सवाल भाजपा आमदार संजय कुटे यांनी केला.