लसींचं राजकारण बंद करा

देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारला लसीकरण, टाळेबंदी, रेमडेसिवीयर यावरून खडे बोल सुनावले आहेत.

लसींचं राजकारण बंद करा

सचिन वाझेने लिहीलेल्या खळबळजनक पत्राच्या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला रेमडेसिवियर औषधाचा काळा बाजार, लसींचा पुरवठा टाळेबंदी याबाबत देखील सुनावले.

रेमडेसिवियरचा काळाबाजार होता कामा नये

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सरकारने रेमडेसिवियरचा काळा बाजार रोखावा. मागच्या वेळी देखील औषधांचा काळा बाजार झाला होता. आता विशेष लक्ष देण्याची लक्ष देण्याची गरज आहे. रेमडेसिवियरचा काळा बाजार होता कामा नये. ही लाट काही राज्यांत आहे, काही राज्यांत ही लाट नाही, तिथून औषध उपलब्ध होईल का याचा प्रयत्न सरकारने करावा.

हे ही वाचा:

वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

टाळेबंदीपूर्वी सगळ्या घटकांशी चर्चा आवश्यक

सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अभियाना अंतर्गत कठोर निर्बंध लादले आहेत. त्यात वीकेंडला संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे, तर इतर दिवशी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यावरून देखील फडणवीसांनी सरकारला लक्ष्य केले.

ते म्हणाले की, “लॉकडाऊन पूर्वी सर्व घटकांशी चर्चा आवश्यक होती. सर्वांना विश्वासात घेऊन, मग योग्य ती पावले उचलायला हवी होती. सामान्यांचा जीव वाचला पाहिजे, पण तो वाचण्यासाठी त्यांना दोन पैसे मिळायला हवेत, खायला मिळायला हवे.” असेही फडणवीसांनी सांगितले.

“सरकार आणि समाज एकमेकांसमोर येऊन चालणार नाही, त्यांच्यात समन्वय हवा.” असे मत देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केले.

लसींचं राजकारण बंद करा

फडणवीसांनी यावेळी ठाकरे सरकारला लसींबाबत देखील टोला लगावला. ठाकरे सरकाने लसींचं राजकारण बंद करावं असे खडे बोल त्यांनी सुनावले.

“ठाकरे सरकारने व्हॅक्सिनवरून चालू केलेलं राजकारण बंद करावं. कालच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळणाऱ्या लसींबाबतचे पत्र प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशपेक्षा जास्त लसी महाराष्ट्राला मिळत आहेत.” असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील मुद्द्यांना हात घालण्यापूर्वी सचिन वाझेने लिहीलेल्या पत्रावरून देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

Exit mobile version