महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. ‘राज्य सरकारने आपल्या मनाला येईल तसे वागायचे आणि केंद्रावर ढकलायचे हे बंद केले पाहिजे’ असे फडणवीस म्हणाले आहेत. तर मंदिरे खुली करू नका असे केंद्र सरकारने कुठे सांगितले आहे? हे राज्याने मला दाखवून द्यावे असे आव्हान फडणवीस यांनी दिले. नवी मुंबई येथे फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Temples have opened in other States.
MVA Govt must stop blaming GoI for hiding their own failure on decision on temples.
मंदिरं खुली करण्यावरून आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर दोषारोपण बंद करा.
इतर राज्यांत मंदिरं खुली झाली आहेत!नवी मुंबई येथे माध्यमांशी संवाद..#NaviMumbai pic.twitter.com/zIz4OBztlV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021
महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमावलीच्या नावाखाली मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने सोमवार, ३० ऑगस्ट रोजी यासंदर्भात राज्यभर घंटानाद आंदोलन केले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, १ सप्टेंबर रोजी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकारने आपल्या मनाप्रमाणे मागायचे आणि केंद्रावर ढकलून मोकळे व्हायचे योग्य नाही केंद्राने मंदिर खुले करू नका, असे म्हटले नाही असे फडणवीस यांनी सांगितले. देशभरातील बाकीच्या राज्यांमध्ये मंदिरे खुली आहेत. फक्त महाराष्ट्रातच खुली नाहीत.
“महाराष्ट्र सरकारला दारूची दुकाने उघडता येतात. मॉल सुरू करता येतात. बार, हॉटेल्स सुरू करता येतात. पण मंदिरे मात्र बंद ठेवली आहेत. हॉटेल सुरू करायला आमचा विरोध नाही. पण मंदिरेही खुली झाली पाहिजेत अशी आमची भूमिका आहे.” असे फडणवीसांनी सांगितले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने महाराष्ट्राला बंदीवान केलं
भुजबळ परवेजला राहण्याचं भाडं देतात का?
“मंदिर खुली करा ही मागणी आम्ही आस्थेपोटी करत नाही. हिंदूंचे ३३ कोटी देव चराचरात आहेत. पण ह्या मंदिरांवर अवलंबून राज्यातील बराच मोठा वर्ग आहे. त्यांची उपजीविका या मंदिरांवर चालते. यात फुल विक्रेते, अगरबत्ती विक्रेते, पुजारी अशा सर्वांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी सरकारने काय केले? सरकारने कोरोना काळात त्यांना कोणतीही मदत केली नाही. बार चालवणाऱ्यांचा जेवढा विचार सरकार करते. त्याच्या पाच टक्के तरी या घटकांचा केला जातो का?” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.