जय श्री रामच्या घोषणा दिल्याचा बदला म्हणून वंदे भारत गाडीवर दगडफेक करण्यात आली असा आरोप भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. न्यू जलपाईगुडीहून हावडा येथे परतणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. मालदा जिल्ह्यातील कुमारगंजजवळ ही घटना घडली. दगडफेकीमुळे गाडीच्या डब्याच्या काचेला तडे गेले होते.
दगडफेकीच्या घटनेची एनआयए चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. हावडा स्टेशनवर वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन समारंभात ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याचा बदला आहे असा आरोप भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला. वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी ममता बॅनर्जी यांनी हावडा स्टेशनवर व्यासपीठावर बसण्यास नकार दिला. वंदे भारत एक्स्प्रेसला न्यू जलपाईगुडी येथून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. रेल्वे स्थानकावर आलेल्या गर्दीतील काही लोकांनी घोषणाबाजी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी मंचावर बसण्यास नकार दिला होता.
हे ही वाचा:
‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’
छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग
‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे
यापूर्वीही घडल्या दगडफेकीच्या घटना
याआधीही सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. १५ डिसेंबर २०२२ रोजी छत्तीसगडमधील नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. मात्र प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही. दुर्ग आणि भिलाई स्थानकादरम्यान ही घटना घडली. या घटनेच्या चार दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. .