दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही!

संभल- बहराइचमधील हिंसाचारावरून योगींचा कठोर इशारा

दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही!

उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी संभलच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. गदारोळानंतर संभल हिंसाचारावर वक्तव्य करताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. संभलमधील वातावरण बिघडल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. पुढे ते म्हणाले की, संभलमध्ये १९४७ पासून दंगली होत आहेत. पण, आमचे सरकार आल्यानंतर एकही दंगल झालेली नाही. २०१७ पूर्वी संभल- बहराइच तसेच उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या दंगलींचा तपशील त्यांनी विधानसभेत मांडला.

उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या दंगलींची आकडेवारी सांगताना योगी म्हणाले की, १९४८, १९५८, १९६२, १९७८ मध्ये दंगली झाल्या. १९७८ मध्ये झालेल्या दंगलीत १८४ हिंदूंना जिवंत जाळण्यात आले होते. विरोधक हे सत्य मान्य करणार नाहीत. १९८० मध्ये पुन्हा दंगल झाली. १९८६, १९९०, १९९२, १९९६ मध्ये पुन्हा दंगल झाली. जो कोणी दगडफेक करेल त्याला सोडले जाणार नाही, असा कठोर इशारा त्यांनी दिला आहे. पुराव्याशिवाय कोणालाही अटक होत नसल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला.

हे ही वाचा : 

मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’चा नारा देणं हा गुन्हा कसा ठरू शकतो?

४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलमधील मंदिराजवळील विहिरीतून सापडल्या तीन मूर्ती

सोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा

ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

योगी म्हणाले की, बाबरनामा वाचलाच पाहिजे. सपाचे आमदार आज सभागृहात बोलत होते. ज्या दिवशी त्यांना त्यांची मुळे आठवतील त्या दिवशी त्यांना समजेल. मोहरमची मिरवणूक असो की मुस्लीम समाजाची मिरवणूक हिंदू परिसरातून शांततेने निघते, पण जेव्हा हिंदूंची मिरवणूक मशिदीजवळून जाते तेव्हा दंगली का होतात? जर हिंदू वस्तीतून मुल्सिम मिरवणूक निघू शकते, तर मुस्लीम वस्तीतून हिंदू मिरवणूक का काढू शकत नाही? आता महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. विरोधकांनी आपल्या गैरकृत्याने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. अराजकता, दगडफेक आणि कोणी कायदा हातात घेतल्यास सरकार कडक कारवाई करेल. कोणत्याही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही पण जो दोषी असेल त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. मुस्लीम भागातून हिंदू मिरवणूक काढू शकत नाही असे घटनेत कुठे लिहिले आहे? जेव्हा हिंदूंना रोखले जाते तेव्हा हिंदू परिसरातही प्रतिक्रिया उमटतात. जय श्री रामचा नारा प्रक्षोभक नसून आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे, असे मत योगी आदित्यनाथ यांनी मांडले आहे.

Exit mobile version