नाशिक मध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक

नाशिक मध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक

महाराष्ट्रात सध्या नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा राजकीय रणांगण तापलेले दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसैनिकांनी यावरून कायदा हातात घेत नाशिक येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे.

रायगड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल उद्गार काढले होते. मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा वर्धापनदिन माहीत नाही, यावरून कानशिलात लगावण्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यावरून राणे यांच्यावर महाड, नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. सध्या नारायण राणे चिपळुणात आहेत आणि तिथे त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र

शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश

‘खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर येऊन दोन हात करा’

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

यावरूनच आता राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांमध्ये शिवराळ भाषा पाहायला मिळत आहे. तर नाशिक येथे तर कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्या आहेत.

आता कुठे गेली कोविड नियमावली?
कोविड नियमावलीचे कारण पुढे करत भारतीय जनता पार्टीच्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. तर राज्यात ठिक ठिकाणी या यात्रेच्या आयोजनासाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनात कोविड नियमावली पायदळी तुडवली जात नाही का? असा सवाल विचारला जात आहे. तर कायद्याचा भंग करणाऱ्या या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Exit mobile version