औरंगजेब विरोधी पोस्ट टाकल्याने मुस्लिम जमावाने केली दगडफेक
हिंदू द्वेष्टा मुघल बादशाह औरंगजेबाविरोधात फेसबुकवर पोस्ट केल्याबद्दल, शिवरायांच्या महाराष्ट्रात मुस्लिम जमावाने दगडफेक केली आहे. मुस्लिम जमावाने १५० लोकांच्या संख्येने काल (१९ ऑक्टोबर) रात्री १०:३० च्या सुमारास उस्मानाबादमध्ये दगडफेक केली. उस्मानाबाद शहरातील विजय चौक परिसरामध्ये वाहनांवर आणि होर्डिंग्जवर ही दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलिसांची गाडी आणि एक रिक्षा यांची तोडफोड करण्यात आली. बुधवारी पोलिसांनी ही माहिती पीटीआयला दिली.
ही घटना रात्री १०:३० च्या सुमारास घडली. मंगळवारी विजय चौक परिसरात हिंसक मुस्लिम जमावाला रोखण्याचा प्रयत्न करताना चार पोलीस जखमी झाले. “जमावाने विजय चौक परिसरात एक होर्डिंग, पोलिस वाहन आणि ऑटो रिक्षाची तोडफोड केली. जमावाला रोखण्याचा प्रयत्न करत असताना एका अधिकाऱ्यासह चार पोलिस जखमी झाले.” असे उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी पीटीआयला सांगितले.
हे ही वाचा:
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
या प्रकरणी ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १५० ते १७० अज्ञात आंदोलकांविरोधात कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३३३ (सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कामापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे) सार्वजनिक सेवा, ३५३ (हल्ला किंवा सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यातून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करणे) आणि सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक कायदा या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.
शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत म्हणाले, “ही घटना फार विशेष नव्हती, दोन तरुणांनी फेसबूकवर एक प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या गटाने या प्रतिक्रियेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या फेसबुक प्रतिक्रियेवरून तक्रार आल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत. मात्र, पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना शांत राहणं गरजेचं होतं. विनाकारण चौकात येऊन हुल्लडबाजी करून, दगडफेक करून कायदा हातात घेतला जात आहे.”