गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज संपणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून प्रचार मोहिमेला सोमवारी वेग आला होता. यादरम्यान, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या सूरत येथील ‘रोड शो’ वर दगडफेक झाल्याची माहिती आहे.
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आज, २९ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग आला होता. दरम्यान, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुरतमध्ये प्रचार सभा झाल्यानंतर ते रोड शो करत होते. केजरीवाल यांच्या रॅलीमध्ये लोकांची गर्दी होती तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही या रॅलीमध्ये कव्हरेज करत होते. यावेळी अचानक रॅलीमध्ये दगडफेक सुरु झाली. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, केजरीवाल गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकोट सुरक्षा प्रदान केल्यानंतर पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली.
हे ही वाचा :
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
दिल्लीत घडले भयंकर कृत्य; नात्यातील गुंतागुंत आणि अंजनचे १० तुकडे
केजरीवाल यांच्या ताफ्यावर एका गल्लीतून दगडफेक करण्यात आली. यावेळी केजरीवाल त्यांच्या गाडीत उभे राहून समर्थकांना अभिवादन करत होते. यानंतर, अचानक दगडफेक सुरू झाली. यावेळी दगडफेक करणारे आणि आप समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, १८२ विधानसभा मतदारसंघ असलेल्या गुजरात राज्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.