दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं ‘बारात’

दिग्विजय सिंह यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं ‘बारात’

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या दिग्विजय सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ‘बारात’ असं संबोधलं आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेला ‘बारात’ असं संबोधल्यावर काँग्रेस नेते जोरजोरात हसू लागले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

रविवारी राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. कोटा विमानतळावरून सर्व नेते काँग्रेसच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून झालावाडला रवाना झाले. हे सर्व लोक कोटा विमानतळावर विमानातून खाली उतरल्यावर काही वेळ आराम करण्यासाठी विमानतळावरील लॉजवर पोहोचले होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश हे राहुल गांधींच्या स्वागतासाठी विमानाने आले होते.

हे ही वाचा:

‘अडीच वर्षांत जे झाले नाही ते पाच महिन्यात झाले’

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान, पंतप्रधान, गृहमंत्री बजावणार मतदानाचा अधिकार

लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!

लोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू

दरम्यान, दिग्विजय सिंह राजस्थान सरकारमधील मंत्री शांती धारिवाल यांना म्हणाले ‘शांती, आजपासून ‘बारात’ ची काळजी घ्या. या आवाजाने शांती धारीवाल यांना सभेत स्पष्ट ऐकू आले नाही. पुढे मंत्री शांती धारीवाल यांनी पुन्हा दिग्विजय सिंह यांना विचारले काय म्हणताय. तर दिग्विजय सिंह यांनी पुन्हा तेच उद्गार काढले. आजपासून ‘बारात’ ची काळजी घ्या. ते ऐकून मंत्री शांती धारिवाल यांनी पलटवार करत सर सर्व तयारी पूर्ण झाली आहे असे उत्तर दिले. यानंतर तेथे उपस्थित सर्व नेते जोरजोरात हसू लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अद्याप विवाह केलेला नाही. अशा स्थितीत भारत जोडो यात्रेला ‘बारात’ असे संबोधून दिग्विजय सिंह यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला आहे.

Exit mobile version