तोटा वाढता वाढता वाढे; भेदिले एसटी महामंडळा

तोटा वाढता वाढता वाढे; भेदिले एसटी महामंडळा

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच डबघाईस आलेल्या राज्य परिवहन महामार्गाच्या एसटी बसेसना दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आणखी तोटा झाला आहे.

१७ ते २६ जुलै या कालावधीत तब्बल १८ कोटींचे नुकसान एसटीला झालेले आहे. यामागे गाड्या दुरुस्ती तसेच गाड्या रद्द करण्यात आल्या अशी कारणे आहेत.

कोरोना निर्बंधांमुळे एसटीची अवस्था डबघाईला आलेली आहे. सद्यस्थितीला एसटीचा एकूण तोटा हा ७ हजारांपेक्षा जास्त आहे. मुंबई विभागातील तब्बल ९ कोटी १० लाख ७६ हजार रुपयांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच इतर अनेक भागांमध्ये काहीशी अशीच परिस्थिती आहे. गेल्या दहा दिवसात अदमासे ३८ हजार ४१० फेऱ्या रद्द झालेल्या आहेत. तसेच पावसामुळे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या विभागामध्ये बस स्थानकांसह साहित्याचेही खूप मोठे नुकसान झालेले आहे.

हे ही वाचा:

बसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच

‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल

पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?

आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…

अदयाप जूनचा पगार एसटी कर्मचारी वर्गाला मिळाला नाही. त्यामुळे कर्मचारी हतबल झालेला आहे. कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बस काही काळासाठी बंद होत्या. त्यामुळे जवळपास २ हजार ७५० कोटींचे एसटीचे उत्पन्न बुडालेले आहे. एकीकडे डिझेल पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली म्हणून बोंब मारणारे, ठाकरे सरकार कर्मचारी वर्गाचे पगारही वेळेवर देत नाहीत त्याचे काय करायचे. त्यात आता हे पावसाळी संकट आल्यामुळे एसटीची अवस्था अधिक बिकट झालेली आहे.

Exit mobile version