उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरले आहे. हिंदुत्ववादी न मानणाऱ्या काँग्रेसकडे कोल्हापूरची जागा जाऊ नये आणि ते जर हिंदू असतील तर त्यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने सांगावे, असा निशाणा चंद्रकांत यांनी काँग्रेसवर साधला आहे. अविश्वासाने आलेलं सरकार टिकवण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचे म्हणत चंद्रकांत यांनी शिवसेनेलाही धारेवर धरलं.
काही वेळेपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ मीटिंगद्वारे कोल्हापूर जनतेला संबोधले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरकरांना भगव्याला मतदान करा असे सांगितले होते. यावरच चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले भगव्याला मतदान करा, आता थोडक्यात भगवा म्हणजे भाजपाच आहे. कारण काँग्रेस हे हिंदुत्ववादी मानतच नाही, त्यामुळे भगव्याला मतदान म्हणजे भाजपाला मतदान, असा युक्तिवाद चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हे ही वाचा:
मायावती म्हणतात, राहुल गांधी यांनी आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहावे!
‘जर भोंगे वाजल्याने राग येत नाही तर हनुमान चालीसा लावल्याने का येतो’
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा भाजपा करणार सत्कार! पाच लाखांचा पुरस्कारही जाहीर
पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल
पुढे ते म्हणाले, अविश्वासाने आलेलं सरकार टिकवण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे, मुख्यमंत्रीपद देखील अविश्वासानेच ठाकरे सरकारने मिळवलं आहे. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करावा लागला आहे. भाजपाने हिंदुहृदयसम्राट केला असल्याच्या ठाकरेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत, ते बनण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.