“राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची नाही तर देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्र्याची राज्याला गरज आहे. असं विधान भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी.रवी यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. असा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे, फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांसाराखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांचा नेहमीचा उद्योग झाला आहे. अशी टीकाही त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. रोज वर्तमानपत्रात अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हिंदूंना रोज अपमानित व्हावं लागत आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूंना नावं ठेवत आहे. रशीद अल्वीही हिंदूंवर टीका करत आहे. शिवसेनाही त्यांच्यासारखी आहे. ठाकरे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे. अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?
वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण
मोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन
महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे. असं ते म्हणाले. २०१९ मध्ये जनतेने भाजपला मतदान केलं आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे. अशी टीका त्यांनी केली होती.