24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणराज्यमंत्री कपिल पाटील ५ हजार टी बी पेशंट दत्तक घेणार

राज्यमंत्री कपिल पाटील ५ हजार टी बी पेशंट दत्तक घेणार

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे ठाणे जिल्ह्यातील ५ हजार टीबीचे पेशंट दत्तक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी टीबी पेशंटसंबंधी मोठे पाऊल उचलले आहे. कपिल पाटील हे ठाणे जिल्ह्यातील ५ हजार टीबीचे पेशंट दत्तक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिम, भिवंडी, ग्रामीण बदलापूर या परिसरातील ५ हजार टी बी पेशंट कपिल पाटील दत्तक घेणार आहेत.

कपिल पाटील यांनी या मतदारसंघातील आरोग्यविभागात काम करत असणाऱ्या डॉक्टरांकडून टीबी रुग्णांची माहिती घेतली आहे. कल्याण पश्चिम, भिवंडी, ग्रामीण बदलापूर या परिसरात ५ हजार टीबी पेशंट असल्याची माहिती डॉक्टरांनी कपिल पाटील यांना दिली आहे. त्यानंतर हे सर्व पेशंट सहा महिन्यापर्यंत दत्तक घेणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे.

या रुग्णांना पुढील सहा महिने किट देण्यात येणार आहेत. या किटचा एका महिन्याचा खर्च ६०० रुपये आहे. किट आणि शासकीय औषध या माध्यमातून पेशंट टी बी मुक्त होतील, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच भिवंडी लोकसभा टीबी मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केल्याचे म्हटले. शिवाय ज्यांची क्षमता आहे त्यांनी असे रुग्ण दत्तक घेऊन भारत टीबी मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील कपिल पाटील यांनी केले आहे.

हे ही वाचा:

‘संसदभवनावरील सिंह क्रूर दिसत नाहीत, हा तर बघणाऱ्याचा दृष्टिकोन’

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

नवरात्र २०२२ : कामाख्या मंदिराचे तेजच निराळे

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त टीबी मुक्त भारत संकल्पनेसाठी प्रत्येक खासदारांनी टीबीचे सहा पेशंट दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देताना कपिल पाटील यांनी ५ हजार पेशेंट दत्तक घेणार असल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा