‘राज्य सरकारला मिळाले पेट्रोलच्या करापोटी २४ हजार कोटी’

‘राज्य सरकारला मिळाले पेट्रोलच्या करापोटी २४ हजार कोटी’

फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला म्हटले नौटंकी

सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरून काँग्रेसचे आंदोलन केले आहे. पण हे आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी असल्याची टीका करत वास्तव परिस्थिती काँग्रेसकडून सांगितली जात नसल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्याला गेल्यावर्षी पेट्रोलच्या करापोटी २४ हजार कोटी रुपये मिळाले. आता जर पेट्रोल-डिझेवरील कर थोडा कमी केला तरीही ते करावर कर लावत असल्यामुळे त्यांना तेवढेच पैसे मिळणार आहेत. पण सरकार लोकांना दिलासा देऊ इच्छिते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत समर्थ बूथ अभियानासंदर्भात मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी या आंदोलनाचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, मी यापूर्वी म्हटले आहे पेट्रोलमध्ये एकूण ३० रु. थेट राज्याला मिळतात. आणि केंद्राला जे करापोटी मिळतात त्यातील १२ रुपये राज्यांना परत येतात. माजी अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचा याबद्दलचा अभ्यास आहे. अर्थमंत्री त्यांनी आकडेवारी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे.

फडणवीस म्हणाले की, गेल्यावर्षी राज्य सरकारला करापोटी मिळाले २४ हजार कोटी. आता हजार दीड हजार कोटी कमी केले तर करावर कर लावत असल्यामुळेही तेवढेच पैसे पुन्हा मिळतील. त्यामुळे राज्याच्या मनात असेल तर राज्य जनसामान्यांना दिलासा देऊ शकते.

विधानसभेचा अध्यक्ष आवाजी मतदानाने निवडता येईल का, या प्रश्नावर फडणवीस यांनी सांगितले की, नियम बदलण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. पण सध्या अध्यक्षच नसल्यामुळे तो अधिकार उपाध्यक्षांना नसतो. ठाकरे सरकारकडे बहुमत आहे, मग तुम्ही घाबरता का, कशाला हात वर करून अध्यक्ष निवडायचा आहे? तुमच्यात सगळे काही आलबेल नाही. एकमेकांवर विश्वासाचे वातावरण नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नितेश राणेंवर मोठी जबाबदारी

ठेवींच्या उठाठेवींवरून शिवसेनेची पालिकेत कोंडी

ओबीसी आरक्षणासाठी पुढाकार तर घ्या, आम्ही मदत करू

…पडळकरांच्या गाडीवर हल्ला करण्याची म्हणून झाली ‘छाती’

स्वबळाच्या बाबतीत फडणवीस म्हणाले की, नाना पटोले एक बोलतात, पवार आपले मत व्यक्त करतात, काही लोक नाना पटोलेंना न घेता पवार साहेबांना भेटतात, यावरून लोकांना कळते ना नेमके काय चालले आहे ते!

फडणवीसांनी समर्थ बूथ अभियानाबाबत सांगितले की,  आम्ही समर्थ बूथ अभियान सुरू केले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत बुथची रचना १०० टक्के बुथपर्यंत १०० पोहोचविण्याचे हे काम आहे. आज प्रशिक्षण दिले जात आहे. विविध जिल्ह्यातील, लोकसभा क्षेत्रातील प्रमुखांसमोर समर्थ बूथ अभियानाचा ढाचा मांडणार आहोत, त्याचे प्रशिक्षण देणार आहोत.

Exit mobile version