बाळासाहेबांचे विचार आमच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम करत राहू!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांना श्रद्धांजली

बाळासाहेबांचे विचार आमच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम करत राहू!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती असून २३ जानेवारी हा दिवस सर्वच शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा, आनंदाचा दिवस आहे. या दिवशी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन आज केले जाते. ‘सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नेहमीच करण्यात आले आहे’,असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की  ,८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हाच  मूलमंत्र बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. बाळासाहेबांच्या विचारधारेवरच सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झाले आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. सर्वांना आपलं वाटणारं सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

या राज्यातील सर्वसामान्य माणूस, समाज घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आले पाहिजे, अशी भावना बाळासाहेबांची होती, त्या विचारांची भूमिका शिंदे-फडणवीस सरकार पुढे घेऊन जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिम्मित मुंबईतील फोर्ट परिसरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

“मराठी माणसामध्ये अस्मितेचा अंगार फुलवणारे आणि हिंदुत्वाचा हुंकार चेतवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिरसावंद्य मानून उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांचेच विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयन्त करत आहोत”असेही मुख्यमंत्री यावेळेस बाळासाहेबांना अभिवादन करताना म्हणाले

Exit mobile version