ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याची सुरवात मातोश्रीपासून करा

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक सल्ला

ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याची सुरवात मातोश्रीपासून करा

एल्विश यादव ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा, असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार करतात, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. “दुसऱ्यांना नौंटकी बोलण्याऱ्या संजय राऊतचं आयुष्य तमासगीर सारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर येऊन राहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा,” अशी घाणाघाती टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

“कोरोनानंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारताची अर्थव्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता. आता उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत ठाकरे गट नावाचं छोटं मित्रमंडळ झालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा,” असा टोला नितेश राणेंनी लागावला आहे.

हे ही वाचा:

मोदींचे स्केच काढणाऱ्या चिमुकलीला लिहिलं पत्र

पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला

इस्रायलचा गाझामधील शाळेवर एअर स्ट्राईक; २० जण ठार

उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेलेले असताना आदित्य ठाकरेमध्येच उठून गेलेले. तेव्हा कुठल्या नशेत होते? तुमच्या मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे? कोणकोणत्या ड्रग माफियासोबत पार्टी करतो ते सांगावं लागेल,” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुमच्या मालकाचे कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल, असंही नितेश राणे म्हणाले.

Exit mobile version