उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मॅरेथॉन रॅलीत चेंगराचेंगरी, मुले जखमी

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मॅरेथॉन रॅलीत चेंगराचेंगरी, मुले जखमी

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात आज एका काँग्रेस नेत्याने मॅरेथॉनचे आयोजन केले होते.लडकी हूँ, लड सकती हूँ या प्रियांका गांधी यांच्या घोषणेच्या निमित्ताने ही मॅरेथॉन मुलींसाठी आयोजित केली होती पण त्यात प्रचंड चेंगराचेंगरी झाली. काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉनमध्ये शेकडो महिला व लहान मुले सहभागी झाली होती. मात्र, मॅरेथॉनचे व्यवस्थापन नीट केले नव्हते. सहभागी झालेल्या मुली, महिला, मुलांनी धावायला सुरुवात करताच काही मुली जमिनीवर घसरून पडल्या. धावणारा जमाव पुढे सरकल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक जण जखमी झाले.

या मॅरेथॉनचे आयोजन काँग्रेस नेत्या आणि बरेलीच्या माजी महापौर सुप्रिया आरोन यांनी केले होते. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोन म्हणाले, “वैष्णव देवी यासारख्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते तर त्यामानाने ही घटना सामान्य आहे, तेव्हा ही घटना अधोरेखित करू नये.”

हे ही वाचा:

चिन्यांना प्रत्युत्तर; भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात फडकावला तिरंगा

गलवानवरून टीका करणारे तोंडावर आपटले; चिनी ध्वज त्यांच्याच भूमीतला

‘जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार’

‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’

या घटनेसाठी त्यांनी माफी मागितली आणि ही घटना काँग्रेसविरोधातील षडयंत्र देखील असू शकते असे सांगितले.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये “लडकी हूं, लड सकती हूं” ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचा एक भाग म्हणून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

वायरल झालेल्या व्हिडीओत अनेक मुली मॅरेथॉनमध्ये धावताना दिसत आहेत आणि अचानक झालेल्या गर्दीमुळे सहभागी जमिनीवर पडल्या. त्यामुळे मागून येणाऱ्यांना अचानक थांबावे लागले, त्यामुळे आणखी सहभागी खाली पडले. महत्त्वाचे म्हणजे, कोविड-19 चा धोका असूनही आणि विषाणूविरूद्ध लसीकरण केलेले नसतानाही मुलांपैकी कोणीही मास्क घातलेले दिसले नाही.

Exit mobile version