सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी

सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी

“आपण ही लढाई एकत्रित आणि भक्कमपणे न्यायालयात लढू.” असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना धीर दिला आहे.  आजच बीड जिल्ह्यातील कड्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कड्यामध्ये एसटी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. “सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत. पण माझी एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की, आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलू नका.” असंही फडणवीस म्हणाले.

बाळू  महादेव कदम असे या चालकाचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कदम हे आज बस क्रमांक एम-एच २० बीएल २०८६ जामखेड-पुणे गाडी घेऊन कडा बसस्थानकात आले होते. यावेळी त्यांनी बसस्थानक परिसरामध्ये बस पार्क करून, विष प्राशन केले. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी संबंधित चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.  या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

एक पोटनिवडणूक जिंकून यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतायत

२०३० पर्यंत चीनकडे हजार अण्वस्त्र

दिवाळी हा अमेरिकेतही राष्ट्रीय उत्सव जाहीर

लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या

एसटी कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीने आत्महत्या करायची वेळ आल्याने भाजपा ठाकरे सरकारवर आक्रमक झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Exit mobile version