27 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारणमध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर

मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर

Google News Follow

Related

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. पण या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने गुरुवारीही उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने घेतला आहे. दरम्यान, उपोषणात कामगार सामील झाल्याने राज्यातील ११ आगार पूर्णत: बंद आहेत. आज मध्यरात्री १२ पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. याशिवाय जर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं आहे.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे. गेले १५ दिवस झाले सरकार गांजा आणि चरसच्या मागे लागले आहे. असा आरोप पडळकरांनी केला आहे.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. नाशिक, मनमाड, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलन तीव्र झाल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

हे ही वाचा:

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?

‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी

“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

पुणे आणि कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पुण्यात स्वारगेट परिसरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा