28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणएसटीचा संप खरोखरच मागे, की फक्त एका गटाची माघार

एसटीचा संप खरोखरच मागे, की फक्त एका गटाची माघार

Google News Follow

Related

एसटी कर्मचाऱ्यांचा गेला महिनाभर सुरू असलेला संप संपुष्टात आल्याचे सोमवारी रात्री जाहीर करण्यात आले असले तरी हा संप खरोखरच मिटला आहे की, केवळ एका गटाने त्यातून माघार घेतली आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

महाराष्ट्र राज्य कनिष्ट वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. पण महिन्याभराच्या या कालावधीत ही संघटना संपात सक्रीय असल्याचे न दिसल्यामुळे हा संप खरोखरच मागे घेतला गेला आहे की नाही हे समजणे शक्य झालेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांबाबत न्यायालयात बाजू लढविणारे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र संप मागे घेतला गेलेला नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे संप मिटण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सातत्याने संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले होते, पण आंदोलनावर कर्मचारी ठाम होते.

एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मुख्य मुद्दा प्रलंबित आहे. हा मुद्दा वगळता एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली, सेवासमाप्ती या कारवाया मागे घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय, आता एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असेही म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

चेंबूरच्या वाशीनाका येथे गोळीबार, एक जखमी

का आहे रेड्याची किंमत ८० लाख??? वाचा सविस्तर…..

मुंबईकरांच्या नशिबी खराबच रस्ते; कंत्राटदाराच्या फायद्यासाठी उणे दराच्या निविदा

बॅडमिंटनपटू श्रीकांत जागतिक स्पर्धेत रौप्य जिंकणारा पहिला भारतीय पुरुष

 

एसटी कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षांत दयनीय अवस्था झाली आहे. यावेळेला तर कोरोनामुळे एसटीचे पुरते कंबरडे मोडले. एसटी कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने वेतनही मिळाले नाही. त्यामुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. त्यात मग भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेदेखील उतरले आणि त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्यात आले. पण नंतर पडळकर आणि खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली. पण विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरूच होते. सोमवारी झालेल्या यासंदर्भात सुनावणीनंतर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा अजय गुजर यांनी केली. यानिमित्ताने अजय गुजर कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा