सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. सदावर्ते यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या नावाने सदावर्ते यांनी संघटनेची स्थापना केली आहे. सोमवार, ९ मे रोजी सदावर्ते यांनी याची अधिकृत घोषणा केली असून सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तब्बल दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात ५० शाखा आहेत. तर एसटी बँकेचे राज्यात सुमारे ९० हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार या निवडणुकीत उतरतील.

कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कोणत्याही धर्माचे जातीचे लोक एकत्र येऊ शकतात. त्या सर्व अभ्यासकांचे स्वागत आहे. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मोलाचे ठरणार आहे. उच्च न्यायालयाने सांगतल्यानंतर जी संघटना आधी होती. तिची मान्यता आता संपली आहे. त्यामुळे त्या संघटनेचे आता कोणीही सभासद नाही. त्यामुळे आता नव्या संघटनेची गरज आहे. पुढील प्रश्न हे या संघटनेच्या मार्फत मार्गी लावण्यासाठी आता प्रयत्न होतील, असे सदावर्ते या संघटनेच्या स्थापनेच्या घोषणेवेळी म्हणाले.

हे ही वाचा:

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू

सुहेल खंडवानी, सलीम फ्रूट, समीर हिंगोरा NIA च्या ताब्यात

‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा उभारणार की आणखी दुसऱ्या पर्यायाचा वापर करणार याची उत्सुकता होती. आज त्यांनी नव्या संघटनेची स्थापना केल्यामुळे याचं उत्तर मिळाले आहे.

Exit mobile version