महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यासंबंधीचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. ठाकरे सरकारकडून आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यासाठी दिवाळीच्या तोंडावर २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तर मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनाच्या वेळी एसटी कर्मचारी मोर्चा काढतील असा इशाराही देण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत मिळावा, रखडलेली देणी लवकरात लवकर देण्यात यावी, तसेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही काळापासून केल्या जात आहेत. पण या मागण्यांची दखल ठाकरे सरकारकडून घेतली जात नाहीये. यामुळेच राज्यातील एसटी कर्मचारी ठाकरे सरकार विरोधात संतप्त झाले असून त्यांनी २७ तारखेला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर याआधीच एसटी कर्मचारी संघटनेने दिवाळीपासून राज्यभर आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.
हे ही वाचा:
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
होय…आर्यनला ड्रग्स पुरवले! अनन्या पांडेची कबुली
अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर
संघाची बदनामी जावेद अख्तरांना भोवणार? फौजदारी तक्रार दाखल
सध्या कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झालेले पाहायला मिळाले. त्यांचे हक्काचे वेतन त्यांना अनेकदा वेळच्यावेळी झालेले दिसले नाही. या परिस्थितीला कंटाळून राज्यातील तब्बल २५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनापासून प्रलंबित ठेवले जाऊ नये अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.