एसटीच्या फेऱ्या कमी होणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच या एसटीच्या फेऱ्या असतील, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. तर सध्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासावरही काही निर्बंध आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. तसेच विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेच्या प्राणांची आम्हाला पर्वा असल्याचंही अनिल परब बोलताना म्हणाले.
अनिल परब यांनी बोलताना सांगितलं की, “नव्या निर्बंधांनुसार, जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण त्या केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच सुरु राहतील. यासंदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाइन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.”
हे ही वाचा:
प्रायव्हसी पॉलिसी प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका फेटाळली
माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन
सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे
मोदींचे आज जागतिक पर्यावरणीय बदल परिषदेत संबोधन
अनिल परब म्हणाले की, “त्या संदर्भात आता जे काही निकष आहेत, जिल्हाबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचं? कशा पद्धतीने ठेवायचं? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयाब बैठक होणार आहे.” तसेच याकाळात एसटी संख्या देखील कमी होईल, कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच एसटी सुरु राहणार असल्यामुळे एसटींची संख्या कमी राहिल, असं अनिल परब म्हणाले. त्याचप्रमाणे शासनाच्या गाइडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर लोकं जाणार असतील, तर सरकारने म्हटल्यानुसार, त्यांना हातावर शिक्के मारून १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन ठेवलं जाईल, अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.