दहावी- बारावीच्या परिक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

दहावी- बारावीच्या परिक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील कोविडच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं काय करायचं याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे ही परिक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा अशी मागणी केली होती.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात

रियाझ काझींचे पोलिस सेवेतून निलंबन

आज मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर या परिक्षांचे नवे वेळापत्रक जाहिर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बारावीच्या परिक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परिक्षा जून महिन्यात होणार आहे. या परिक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

राज्यात रविवारी सुमारे ६३ हजार कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे दहावी आणी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी करण्यात येत होती. राज्यात लवकरच लॉकडाऊन होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी परिक्षांबाबत स्पष्टता होणे आवश्यक होते.

यापूर्वी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच इतर बोर्डांना देखील त्यांच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्याविषयी विनंती करण्यात येणार आहे.

Exit mobile version