महायुतीचे ठरले! कल्याणमधून श्रीकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले नाव

महायुतीचे ठरले! कल्याणमधून श्रीकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा महायुतीचा प्रश्न अखेर मिटला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली आहे. महायुतीकडून या मतदार संघात विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. नागपूर येथे भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणच्या जागेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “श्रीकांत शिंदे यांना भाजपाकडून विरोध नाही. ते कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि मागच्यावेळपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना आम्ही सर्वजण निवडून आणू,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनंतर आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील याची खात्री झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर- राणे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे.

हे ही वाचा.. 

प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला

फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव

रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

खेकड्यामुळे रोहित पवार अडचणीत

श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपाचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणपत गायकवाड किंवा त्यांचे पदाधिकारी यांची नेमकी भूमिका काय असणार याकडे लक्ष असणारे आहे. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरच्या एका पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना अटक झाली होती.

Exit mobile version