श्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा

श्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा

श्रीलंका देश अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेतील दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ६ मेच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली होती. त्यांनतर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजपक्षे यांचा राजीनामा श्रीलंकेत हिंसाचाराच्या घटनांदरम्यान देण्यात आला आहे, ज्यामध्ये किमान १६ लोक जखमी झाले आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ जमलेल्या सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात कर्फ्यू लागू केला. महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा देण्यासाठी दबाव होता. या दबावाविरुद्ध ते पाठिंबा मिळवण्याची तयारी करत होते. मात्र अखेर त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे.

राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी, “मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच हिंसेने फक्त हिंसाचार वाढतो असा सल्लादेखील त्यांनी श्रीलंकेच्या जनतेला दिला आहे. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू

दरम्यान, श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात परदेशी चलनाची कमतरता आहे. अशातच मोठ्या प्रमाणात आयातीवर निर्भर असलेल्या श्रीलंकेला बाहेरून जीवनावश्यक वस्तू मागवण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. तसेच महागाईनेही उच्चांक गाठला आहे. ज्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.

Exit mobile version