विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कर्णधारपदावरून सुरू असलेल्या वादावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, ” खेळापेक्षा कोणीही मोठा नाही “.खेळाडूंमध्ये काय चालले आहे याबद्दल मी काही माहिती देऊ शकत नाही. संबंधित संस्था आणि असोसिएशनच याबाबत योग्य ती माहिती देऊ शकतात, असे ते म्हणाले.
एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची हकालपट्टी केल्यापासून विराटने ते मनावर घेतले असल्याचेही बोलले जात आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले होते. त्याने हेही सांगितले होते की, एकदिवसीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी तो राहणार आहे.
मात्र रोहित शर्माची बीसीसीआयने वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्यापासून कर्णधारपदावरून वाद सुरू झाला आहे. मात्र, रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले होते. यासंदर्भात विराट कोहलीशी बोलणेही झाले आहे, असे ते म्हणाले होते. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत. त्यामुळे रोहित शर्माकडे वनडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ३८ इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना!
ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी
अभिमानास्पद! आणखीन एका जागतिक कंपनीच्या प्रमुख पदी भारतीय वंशाची व्यक्ती
राज्यातील निवडणूका पुढे ढकलणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव
दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर दोन्ही कर्णधारांशी चर्चा करून वाद सोडवला जाईल.