गुजरातमधील दोन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुका लवकरच पार पडणार असून यासाठी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आप हे दोन पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी शुक्रवारी जाहीर केले की, काँग्रेस त्यांच्या इंडी आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या आम आदमी पार्टीसोबत युती न करता विसावदर आणि काडी विधानसभा जागांसाठी स्वतंत्रपणे पोटनिवडणुका लढवेल.
काँग्रेसच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा इंडी आघाडीत काहीही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. गुजरात राज्यातील मागील निवडणूक कलांचे विश्लेषण केल्यानंतर हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे गोहिल यांनी स्पष्ट केले. गुजरातने कधीही तिसऱ्या आघाडीला मतदान केलेले नाही. ते पुढे म्हणाले की, मागील निवडणुकीत, आपने सर्वतोपरी प्रयत्न केले. आपच्या सर्व मोठ्या नेत्यांनी पक्षासाठी प्रचार केला, परंतु तरीही त्यांना फक्त १०.५- ११ टक्के मते मिळू शकली आणि निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले. भाजपला पराभूत करण्यासाठी, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आहे आम्ही आप पक्षाला ला त्यांचे उमेदवार मागे घेण्याचे आवाहन करतो (आगामी विसावदर आणि काडी पोटनिवडणुकीसाठी). काँग्रेस पक्ष दोन्ही जागांवर निवडणुका लढवेल, असे ते म्हणाले.
गोहिल यांनी यावर भर दिला की दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर इंडी आघाडीचा भाग राहतील. “राष्ट्रीय स्तरावर, आपण सर्व इंडी आघाडीचा भाग आहोत आणि आपण एक आहोत,” असे ते म्हणाले. जुनागड जिल्ह्यातील विसावदर जागा डिसेंबर २०२३ पासून आपचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाल्यानंतर रिक्त आहे. दरम्यान, अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी राखीव असलेला मेहसाणा येथील काडी जागा ४ फेब्रुवारी रोजी भाजपचे आमदार करसन सोलंकी यांच्या निधनानंतर रिक्त झाली.
हे ही वाचा :
बांगलादेशात हिंदू नेत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या
दिल्लीत इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांकडून प्राध्यापकाला मारहाण?
नालासोपाऱ्यात घुसखोर बांगलादेशीला अटक, आतापर्यंत ९ जण ताब्यात!
निवडणूक आयोगाने अद्याप पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. ८ आणि ९ एप्रिल रोजी गुजरातमध्ये झालेल्या काँग्रेसच्या एआयसीसी अधिवेशनादरम्यान पक्षाने गेल्या तीन दशकांपासून सत्तेबाहेर असलेल्या राज्यात निवडणूक विजयासाठी आपला हेतू दर्शविल्यानंतर हे घडले आहे.