25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणस्वातंत्र्यानंतर हिंदू साम्राज्य झाले असते तर आज देश जगात सर्वश्रेष्ठ ठरला असता

स्वातंत्र्यानंतर हिंदू साम्राज्य झाले असते तर आज देश जगात सर्वश्रेष्ठ ठरला असता

Google News Follow

Related

सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे प्रतिपादन

काँग्रेस, मुस्लीम लीग आणि ब्रिटिश यांना हिंदू साम्राज्य होऊन द्यावयाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी नेहमी तशीच पूरक भूमिका घेतली होती. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यावेळी जर हिंदुंचे साम्राज्य झाले असते तर जगामध्ये आपला देश श्रेष्ठ देश ठरला असता. मात्र आजही अजून वेळ गेलेली नाही. त्यासाठी हिंदू एकत्र आले पाहिजेत, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातूू रणजित सावरकर यांनी ऑनलाइन व्याख्यानात केले.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, त्यांचे द्रष्टेपण, हिंदुत्त्वाबाबत असणारा दृष्टिकोन, मुस्लीम लीगची पार्श्वभूमी, स्वतंत्र राज्यासाठी मुस्लिमांनी केलेली मागणी, खिलाफत चळवळ आणि मुस्लिमांच्या मागण्यांना महात्मा गांधी यांनी सातत्याने दिलेले समर्थन आणि पाठिंबा हा हिंदूंना कसा मारक ठरला त्याचे तपशीलवार विवेचन रणजित सावरकर यांनी व्याख्यानात केले.

हे ही वाचा:
मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव

‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य

ठाकरे सरकारच्या बेपर्वाईने, ओबीसींचा राजकीय हक्क डावलला जाणार

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना काळ्या पाण्यावर अंदमानात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा भारतात १९२१ मध्ये पाठवण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी केली गेली. यामुळे हे वर्ष महत्त्वाचे असल्याचे सांगत रणजित सावरकर म्हणाले की, इतिहास हा पुन्हा घडत असतो. या वर्षाच्या महत्त्वाच्या निमित्ताने आपल्याला पूर्वीच्या सर्व बाबींना आठवत नव्याने पावले टाकायची संधी मिळालेली आहे. हिंदुंना या निमित्ताने एकत्र आणण्याची ही बाब आहे.

या व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध प्रसंगात जी जी भूमिका मांडली, जे जे धोक्याचे इशारे दिले, जे मार्गदर्शन केले ते द्रष्टेपणाचे होते, त्याबद्दल रणजित सावरकर यांनी विविध घटनांचा संदर्भ घेत माहिती दिली. विद्यार्थ्यांसमोर आपल्याला ही माहिती देताना विशेष आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुस्लिमांना स्वतंत्र राज्य हवे आणि ती संकल्पना सय्यद अहमद यांनी मांडली ती १८८३ मध्येच. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मही झाला नव्हता. मुस्लीम लीगची स्थापना झाली त्यानंतर सुधारणांद्वारे मुस्लिमांना सवलती दिल्या गेल्या. खिलाफत चळवळीबद्दल तीव्र टीका करीत रणजित सावरकर म्हणाले की, यामागे गांधी यांनी वैयक्तिक पाठिंबाही दिला आणि ते त्या चळवळीचे भारतातील अध्यक्षही होते. १९२१ मध्ये या खिलाफतीला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आणि त्याचे परिणाम हिंदुंनी भोगले. मुसलमान आमच्याबरोबर असला पाहिजे, या गांधींच्या हट्टासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन तेव्हापासून केले गेले. सावरकर यांनी खिलाफतीबाबत तीव्र टीका केली.

केरळमध्ये खिलाफतीच्या पार्श्वभूमीवर तेथील मोपला मुसलमानांनी हिंसाचार अत्याचार करून हिंदूंच्या कत्तली केल्या, बलात्कार केले. तेथे त्यांना अटकाव करण्यासाठी ब्रिटिशांंनी लष्करी कारवाई केली. त्यानंतरही मोपला मुसलमानांनी कृत्यहे जोशात केले मात्र ते मनाने सच्चे आहेत, अशी भलावण गांधींनी या मोपला मुसलमानांची केली.

अब्दुल बारी या एका मुस्लीम धर्मगुरूने फतवा काढला आणि मुसलमानांची पवित्रभूमी भारत नाही ती अफगाणिस्तान आहे असे सांगत तेथे जाऊ, असे त्यांनी मुसलमान भारतीयांना सांगितले. धर्माच्या या आधारानुसार  तेथे १८००० मुसलमान भारतातून गेले. मात्र गांधीनी त्यांना रोखले नाही. तर ते म्हणाले की, मुसलमानांचा जेथे अपमान होतो ते तेथे राहात नाहीत. हे चांगले आहे. म्हणजे एक राष्ट्राचा आधार त्यांना तेथे होता आणि त्याचे समर्थनच गांधीनी केले होते. यामुळे त्यातूनच मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला समर्थनच मिळाले.

खिलाफतीच्या आंंदोलनाची तुलना रणजित सावरकर यांनी सीएए विरोधी आंदोलनाशी करीत भारतातील मुसलमानांना वास्तविक काही देणे घेणे नसूनही त्यांनी सीएए विरोधात आंदोलन केले कम्युनिस्ट आणि काँग्रेसने त्यांचे समर्थन केले. १९२० मध्ये मुस्लीम संख्या २२ टक्के होती. १९४७ मध्ये ती ३५ टक्के झाली आणि विभाजन झाले आजही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आणि विभाजन टाळण्यासाठी सावरकरांच्या विचारांची गरज आहे. हिंदुंनी एकत्र होण्याची गरज आहे.

व्याख्यानात नेहरूंची धूर्त नीती, काँग्रेसचे धोरण आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या कृतींना उघड करीत हिंदूंबाबतच्या  त्यांच्या कृत्यांवर कडाडून टीका केली.
व्याख्यानाच्या अखेरीस विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन व्याख्यानाला आवर्जून उपस्थिती नोंदवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा