आज आषाढी एकादशी निमित्ताने प्रथेप्रमाणे पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूरातून पहिला मेळावा पार पडला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू, आम्हाला तुमची साथ हवी आहे, असे भाषणात सांगितले.
महाराष्ट्रासाठी मी २४ तास काम करणार आहे. मुख्यमंत्री असलो तरी मी जनतेचा सेवक आहे. त्यामुळे मला तुमची साथ हवी आहे. आपल्या राज्याच्या सरकारची प्रतिमा बदलली पाहिजे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गतिमान शासन आणि प्रशासन ही रथाची मजबूत दोन चाक आहेत. त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढवा आणि आम्ही लोकांना न्याय मिळेल अशीच कामे करू, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात खूप क्षमता आहे. आपल्या महाराष्ट्राचा जीडीपी खूप चांगला आहे. या सगळ्याच्या वापर आपण महाराष्ट्राच्या हितासाठी करू. सरकार हे जनतेचं आहे त्यामुळे सरकारचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. यासाठी तुमचीही साथ हवी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार तयार झाल आहे. पंढरपूर देवस्थानाचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, पंढरपूर देवस्थानासाठी पाच कोटींची तरतूद करणार येणार आहे. पंढरपुरात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एक विकास आराखडा बनवणार आहोत. त्यामुळे वारकऱ्यांना चांगल वातावरण मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेलय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
हे ही वाचा:
आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली बॅग
एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला
गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?
राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा…म्हणून पंतप्रधान मोदींची भेट
दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे रविवार, १० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्याला विठुरायाच्या पुजेचा मान मिळाला.