‘भाजपाची सत्ता ३५ ते ४० वर्ष टिकेल’

‘भाजपाची सत्ता ३५ ते ४० वर्ष टिकेल’

भाजपाची पुढील ३५ ते ४० वर्षा देशात सत्ता असेल, असा विश्वास भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अमित शहा बोलत होते. भारत जगाचा गुरु बनेल आणि तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजपा कुटुंबाची सत्ता संपवेल, असेही अमित शहा म्हणाले आहेत.

बैठकीत अमित शहा म्हणाले, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह अन्य राज्यांमध्येही भाजपाची सत्ता येणार आहे. राजकारणातील जातिवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण हे एक मोठा शाप असल्याचे अमित शाह म्हणाले आहेत. तसेच देशाला इतक्या वर्षांपासून भेडसावलेल्या समस्यांची ही मूळ कारणे आहेत. देशाच्या राजकारणातून घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपल्या भाषणादरम्यान अमित शहा यांनी गुजरात दंगलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्लीन चिटचा संदर्भ देत याला ऐतिहासिक असल्याचे नमूद केले.देशात पुढची ३५ ते ४० वर्ष भाजपाची सत्ता असेल आणि यामुळेच भारत जगाचा गुरु बनेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

‘काही छद्मपर्यावरणवाद्यांकडून आरे कार डेपोत आंदोलन’

नुपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी हे Judicial Activismचे उदाहरण आहे का?

अमरावती घटनेत उमेश कोल्हेंच्या हत्येत मित्र युसूफ खानचा सहभाग?

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

कॉंग्रेस हा कुटुंबाचा पक्ष झाला आहे. त्यांचे काही सदस्य पक्षाच्या आतच लोकशाहीसाठी लढत आहे. गांधी कुटुंब अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होऊ देत नाही. त्यांना पक्षावरील आपलं नियंत्रण गमावण्याची भिती आहे. विरोधक असंतुष्ट आहेत आणि सरकार जे काही चांगलं करतं, त्याचा ते विरोधच करत असतात, असा आरोपही यावेळी अमित शहा यांनी केला.

Exit mobile version