‘मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु’

‘मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु’

मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथील सत्कार समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले पण अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु असते, असे सडेतोड उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

जेव्हा एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केले यावर आमदारांना लपवून बळजबरीने नेलं अशी टीका केली जात होती. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, एवढा प्रवास केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जो उत्साह दिसतोय ते पाहून कळते की जबरदस्ती करून आणलेली ही माणसं नाहीत ही माणसं प्रेमाने आलेली आहेत, असे खोचक प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

पुढे ते म्हणाले, जी भूमिका घेतली आहे. ती राज्यातल्या लोकांनी स्वीकारली आहे. विरोधी पक्षातून सत्तेत जाण्याचा ओघ असतो, मात्र इकडे उलटं झालं. लोकं सत्तेतून बाहेर पडले. मला खूप लोकांनी सांगितलं असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो. भाजपालाही बदनाम करण्याचं काम केलं. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी मी गेलोच नव्हतो. कामं केली नसती तर लोकांनी निवडून दिलं असतं का, आजचा मतदार खूप हुशार आहे. मी पाच वेळा समजावलं मात्र त्यात मला अपयश आलं. मग शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. अडीच वर्षात शिवसैनिकांच्या जीवनात काय बदल घडला का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना पक्ष हा चार नंबरवर गेला. आपला पक्ष आपण मोठा करण्यासाठी समोरच्या माणसाने सांगितलेलं ऐकलं पाहिजे. काही शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरे जावं लागलं. मात्र आम्ही सरकारमध्ये असून त्यांना वाचवू शकलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती घेतल्यावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. मी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. मी एकटा मुख्यमंत्री नाही. तुम्ही सर्व लोक मुख्यमंत्री आहात. जेवढं जमेल तेवढा लोकांना न्याय देतोय. शिवसैनिकांचं खच्चीकरण यापुढे होऊ देणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

मी जरी मंत्रालयात नसलो तरी, माझं मोबाईलवर कामं सुरू आहे. गाडीमध्येदेखील माझं काम सुरू असतं काही लोक कागद घेऊन येतात त्यावर मी सह्या करतो. ते मी लगेच फॉरवर्ड करतो त्यावर लगचे काम सुरू होतं. कारण मी आता मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझा शब्द आदेश म्हणून अधिकाऱ्यांना पाळावा लागतो, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.

Exit mobile version