26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणशरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

शरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत नुकताच झिंगाट गाण्यावर डान्स केला. या डान्समुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. “पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

“रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास गंभीर परिणाम

मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?

लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या

धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार

रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळालं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा