अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती

अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून

देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या असून निकालही लागले आहेत. यानंतर एनडीएला बहुमत मिळाले असून एनडीएकडून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. याशिवाय मंत्रिमंडळानेही शपथ घेतली असून पदभार स्वीकारत कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता लोकसभेचे अधिवेशन होणार असून याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

अठराव्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होईल. या कालावधीत नूतन खासदारांची शपथ, लोकसभा अध्‍यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. १८ व्‍या लोकसभेत सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे २९३ खासदार आहेत तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे २४० खासदार आहेत. लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून होणार आहे तर राज्यसभेचे २७ जूनपासून सुरू होणार आहे. नऊ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन संसद सदस्य (एमपी) त्यांची शपथ घेतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू सभागृहाला संबोधित करतील.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडे जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये टीडीपी किंवा जेडीयू या पक्षांच्या खासदाराकडे लोकसभा अध्यक्षपद जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे. तसेच लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपाच्या खासदार डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध

जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

मलावीच्या उपराष्ट्रपतींचा विमान अपघातात मृत्यू!

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९३ जागा जिंकल्या होत्या. निकालानंतर केंद्रात एनडीएचे सरकार येणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार हे अगदी स्पष्ट झाले होते. यानंतर ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १० जून रोजी सर्व मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्री, निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपदी कायम ठेवण्यात आले आहेत.

Exit mobile version