अखिलेश यादव विधानसभा निवडणूक लढवणारच नाहीत
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना. समाजवादी पक्षाचे (SP) प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी जाहीर केले की ते २०२२ साली होणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. यादव यांच्या या विधानानंतर अखिलेश यादव निवडणुकीत उतरायला घाबरले आहेत का? असा सवालही केला जात आहे.
अखिलेश यादव हे आझमगढ मतदारसंघाचे खासदार आहेत, आणि त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा निर्विवाद चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अशावेळी मुख्यमंत्रीपदाचा घोषित उमेदवार आणि पक्ष प्रमुखच जर विधानसभा निवडणूक लढवणार नसेल तर अशा पक्षाचं राजकीय भवितव्य त्या निवडणुकीत काय? असा सवाल राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे.
समाजवादी पक्ष प्रादेशिक पक्षांशी निवडणूकपूर्व युती करण्याकडे लक्ष देत आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षासोबत युती करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.
अगदी अलीकडेच, समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोक दल (RLD) सोबत करार केला आहे, असे अखिलेश यादव म्हणाले. “आरएलडीसोबत आमची युती होणार हे नक्की आहे. लवकरच याबाबतचे जागावाटप निश्चित होणार आहे.” असे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
हे ही वाचा:
जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी
गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!
नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन
काका शिवपाल सिंह यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहिया (PSPL) सोबत युती करण्याच्या शक्यतेवर, यूपीचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, “मला यात कोणतीही अडचण नाही. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना योग्य सन्मान दिला जाईल”.
समाजवादी पक्षाचे मीडिया सल्लागार आशिष यादव यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अखिलेश यादव विधानसभा निवडणूक लढवणार की नाही यावर पक्ष अंतिम निर्णय घेईल.