मुंबईच्या काळाघोडा परिसरातील एका चौकास इस्त्राईलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, या गोष्टीला समाजवादी पक्षाचे नेते आमदार रईस शेख यांनी विरोध केला आहे. सिमॉन पेरेस यांच्या नावाचे फलक हटवण्यात यावेत, अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
भारत आणि इस्राएल संबंधांना गेल्या ५-६ वर्षात ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. बालाकोट ऐरस्ट्रैकच्या वेळी वापरण्यात आलेल्या बॉम्बपासून ते अनेक मिसाईलपर्यंत भारताने अनेक मिसाईल इस्राएलकडून खरेदी केल्या आहेत. भारतामध्ये इस्राएल विषयावर अनेक वेळा मुस्लिम संघटनांकडून मोर्चे आणि निषेध केले जातात. इस्राएल आणि पॅलेस्टाईन संघर्ष आणि त्यामुळे होत असलेले एकमेकांवरचे हल्ले हे काही नवीन नाहीत. परंतु इस्राईलने पॅलेस्टाईनवर प्रतिहल्ला केल्यावर भारतातील काही मुस्लिम संघटना या भारतात इस्राएलविरुद्ध निदर्शने करत असतात.
“भारताच्याच काय मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात श्री. सिमॉन पेरेस यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळे त्यांचे चौकाला नाव देणे योग्य नाही हे नामकरण झाल्यास कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कारण समाजवादी पक्षाने याबाबत प्रत्येक वेळी तीव्र विरोध केला आहे आणि आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे ह्याप्रकारच्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या नामकरण फलकाविरोधात समाजवादी पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल”, अशी धमकी त्यांनी दिली.