सपा नेते स्वामी प्रसाद मौर्यनी हिंदू धर्माविषयी ओकली पुन्हा गरळ

दिल्लीतील भाषणात “हिंदू एक धोका है” असे केले वक्तव्य  

सपा नेते स्वामी प्रसाद मौर्यनी हिंदू धर्माविषयी ओकली पुन्हा गरळ

समाजवादी पक्षाचे (सपा) नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षातील नेत्यांना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीदेखील पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दिल्लीतील जंतर- मंतर मैदानावर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून त्यामध्ये ते म्हणत आहेत की, “हिंदू एक धोका आहे, तसेही सर्वोच्च न्यायालयाने १९९५ मध्ये आपल्या एका आदेशात सांगितलं होतं की हिंदू काही धर्म नाही, ही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दोन वेळा सांगितलं की हिंदू काही धर्म नाही, लोकांची जीवन जगण्याची एक पद्धत आहे, प्रधानमंत्री मोदी यांनी देखील सांगितलं की हिंदू कुठला धर्म नाही, जेव्हा हे लोक वक्तव्य करतात तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत. पण हीच गोष्ट स्वामी प्रसाद मौर्य बोलतात की, हिंदू धर्म, धर्म नही तर एक धोका आहे, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो काही लोकांसाठी धंदा आहे, तेव्हा लोकांच्या भावना दुखावल्या जातात.”

 

हे ही वाचा:

मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!

खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक

अखिलेश यादव यांनी सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी अश्वासन दिलं होतं की, अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाईल. तसेच त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना धर्म आणि जातींबद्दल वक्तव्य करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा फारसा काही फरक पडल्याचे दिसून येत नाहीये. त्यामुळे अखिलेश यादव आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version