उत्तर प्रदेश मधील संभल लोकसभा क्षेत्रातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून गेलेले खासदार डॉक्टर शफीकुर्रहमान बर्क यांनी कोरोना महामारी बद्दल एक अजब वक्तव्य केले आहे. कोरोना हा आजार नसून तो अल्लाहचा प्रकोप आहे. यातून सुटका हवी असेल तर अल्लाहची माफी मागावी असे विधान त्यांनी केले आहे.
गेले वर्षभरापेक्षा अधिक काळ जगभर कोविड महामारीने थैमान घातले आहे. लाखो लोकांना आजवर कोविडची लागण झाली असून हजारोंनी आपले प्राण गमावले आहेत. पण तरीही कोरोना बद्दल अनेक उलटसुलट वक्तव्ये आजही पाहायला मिळत आहेत. असेच एक विचित्र विधान गुरुवारी उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केले आहे.
हे ही वाचा:
मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात
पंजाब सरकारकडूनच लस पुरवठ्यात नफेखोरी?
अभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल
गुरूवारी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना बर्क यांनी सरकारवर मॉब लिंचींग पासून ते कोरोना पसरवण्यापर्यंत अनेक बेछूट आरोप केले. पण याच वेळी कोरोनाबद्दल केलेल्या त्यांच्या एका विचित्र विधानाने उपस्थित साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
खासदार महोदय आपल्या वक्तव्यात असं म्हणाले की कोरोना हा जर एक प्रकारचा आजार असता तर जगात कुठे ना कुठे तरी त्याचा इलाज नक्की असता. आज तो इलाज कुठेही नाही. त्यामुळे हा मुळात आजारच नाही. त्या पुढे जाऊन ते असे म्हणाले की हा अल्लाचा प्रकोप आहे आणि यातून सुटका करून घ्यायची असेल तर अल्लाची माफी मागावी. शफीकुर्रहमान बर्क यांच्या या वादग्रस्त वक्तव्यासाठी त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.