‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’

सपा नेते इंद्रजीत सरोज यांच्याकडून अपमानास्पद वक्तव्य; उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण पुन्हा तापले

‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव इंद्रजीत सरोज यांनी केलेल्या हिंदू देवी-देवतांवर भाष्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानानंतर राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे.

एका सभेत बोलताना सरोज म्हणाले: “जेव्हा परकीय आक्रमक भारतात येऊन लुट करत होते, तेव्हा आपले देव काय करत होते? जर त्यांच्यात शक्ती असती, तर ते त्यांना शाप देऊन नष्ट करू शकले असते. त्यामुळे कुठे तरी कमकुवतपणा होता.” त्यांनी मोहम्मद बिन तुगलक, महमूद गझनी आणि मोहम्मद घोरी यांच्याही उल्लेख केला आणि विचारले की, जर मंदिरांमध्ये इतकीच ताकद असती, तर हे आक्रमण इतके सहज पार पडलं असतं का?

हे ही वाचा:

आयपीएलमध्ये चेक होतेय ‘बॅटची फिगर’!

दंगलखोरांवर एकच उपाय दंडुका!

हवामान विभागाने पुन्हा दिला हिट वेव्हचा अलर्ट

तेजस्वीना नेता मानल्यास काँग्रेसची अधोगती

सरोज पुढे म्हणाले, “दलित आणि मागासवर्गीयांसाठी खरे देव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पीडीए (पिछड़ा, दलित, अल्पसंख्यक) समाजाने त्यांना आपला आराध्य मानले पाहिजे.” त्यांनी हेही म्हटले की, “सत्ता म्हणजे खरी ताकद”. “जय श्रीराम” म्हणणे पुरेसे नाही, निर्णय घेतले जातात तिथे संसदेत खरी ताकद आहे”, असेही ते म्हणाले.

या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते मनीष शुक्ला म्हणाले, “हे विधान अखिलेश यादव यांच्या आदेशावरूनच दिले गेले आहे. सपा मुद्दाम हिंदूंच्या भावना दुखावते आहे.” त्यांनी याला “सामाजिक विघटनाची योजना” म्हटले आणि मुर्शिदाबाद हिंसेशी तुलना करत सरोज यांचे विधान त्यामागची कारणीभूत गोष्ट असल्याचे सांगितले.

Exit mobile version