आझम खानचा निकटवर्तीय एसपीचे माजी राज्य सचिव युसूफ मलिक यांनी मुरादाबाद महापालिकेतील अतिरिक्त महापालिका आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा युसूफ अखेर सोमवारी रामपूर न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे.
आठवड्यांपूर्वी सपा नेते युसूफ मलिक यांचे जावई दानील यांचे काटघर येथील घर पालिकेच्या पथकाने सील केले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त अनिल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरावर २४ लाख रुपयांचा घर कर थकीत होता. जावयाच्या घराला सील ठोकल्याने संतप्त झालेल्या युसूफ मलिक यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्तांना फोन करून घराचे सील तातडीने उघडण्यास सांगितले. आयुक्तांनी नकार दिल्याने युसूफ यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्तांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी युसूफ मलिक आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी युसूफचा जावई दानील याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तर युसूफला अटक करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून पोलिस प्रयत्न करते होते. मात्र युसूफ मलिक पोलिसांना चकवा देत होता. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केले होते.आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत होते.अखेर युसूफ हे स्वतः रामपूर न्यायालयात शरण आले आहेत.
हे ही वाचा:
…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर
संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त
मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार
संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची
जुन्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आरोपींनी आत्मसमर्पण केले. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. सिव्हिल लाइन्स पोलीस लवकरच युसूफ यांची चौकशी करणार आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी सपा नेत्याचा भाऊ युनूस मलिक यालाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे.