उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सरकारने आठ वर्षे पूर्ण केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी विश्वास व्यक्त केला की, भाजपा पक्ष २०१७ मध्ये केलेल्या कामगिरीप्रमाणेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही कामगिरी करेल. तसेच त्यांनी असाही दावा केला की, २०४७ पर्यंत समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचे राज्यात कोणतेही भविष्य राहणार नाही.
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, २०१७ मध्ये भाजपा उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आला आणि २०२५ मध्ये आम्ही शासनाची आठ वर्षे पूर्ण केली. राज्यातील २५ कोटी लोकांच्या जीवनात आलेला परिवर्तन आणि आनंद, झालेला विकास आणि गरिबांच्या कल्याणाकडे वाटचाल करण्याची संधी अतुलनीय आहे. आता पूर्ण विश्वास आहे की, आम्ही २०२७ मध्ये २०१७ ची पुनरावृत्ती करू आणि सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू. २०४७ पर्यंत, उत्तर प्रदेशच्या भविष्यात सपा, काँग्रेस किंवा बसपाचे भविष्य राहणार नाही, असे ते म्हणाले.
यापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सेवा, सुरक्षा आणि सुशासन ही आठ वर्षे पूर्ण झाली आहेत असे सांगितले. भाजपा सरकारची आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री ब्रजेश पाठक, मंत्री चौधरी भूपेंद्र सिंह चौधरी यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे ही वाचा..
कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईचा बडगा
कामराला समर्थन देणाऱ्या विरोधी बाकावरच्यांनी सुपारी दिली आहे का?
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूरीसाठी सार होणार
मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले की, “आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की, आठ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशची स्थिती आणि ओळख कशी होती. ८ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेची स्थिती लपलेली नव्हती. शेतकरी आत्महत्या करत होते, तरुण संघर्ष करत होते, मुली आणि व्यापारी असुरक्षित होते, दंगली आणि ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेमुळे लोक खराब अर्थव्यवस्थेला सहन करत होते,” असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हणत पूर्वीच्या सरकारवर निशाणा साधला.