औरंगजेबाबद्दल विधान करणाऱ्या अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

औरंगजेबाबद्दल विधान करणाऱ्या अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी केले होते त्यानंतर राज्यात मोठा गदारोळ माजला होता. आता औरंगजेबाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अबू आझमी याना एका व्यक्तीकडून जीवे करण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. औरंगजेब वाईट नव्हता, त्याचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आला, असे विधान अबू आझमी यांनी केले होते.

धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आपल्या स्वीय सहाय्यकाच्या नंबरवर धमकीचा फोन आला होता आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा दावा अबू असीम आझमी यांनी केला आहे. आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आला आहे. आमदार अबू आझमी यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

फोन करणाऱ्याने अबू असीम आझमी आणि औरंगजेब यांचा स्वीय सहाय्यक यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०६ (२) आणि ५०४ अंतर्गत गुन्हेगारी धमकी आणि इतर गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन केल्याने त्यांना कॉलवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेची भेट

ऐनवेळी गोळीचं सुटली नाही, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष गोळीबारात बचावले

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बीसीसीच्या माहितीपटाला भारतात बंदी

उद्धव ठाकरे बाद, आता राहुल पंतप्रधान!

वाशिम जिल्ह्यात रविवार, १५ जानेवारीला रात्री एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही लोक मुघल शासक औरंगजेबच्या फोटोसोबत नाचत होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओला हिंदू संघटनांनी विरोध केला होता. आता पोलिसांनी नाचणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version